धाराशिव मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सचिवपदी सुधीर देशमुख
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे )—
महाराष्ट्रभर लौकिक असलेल्या धाराशिव येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या सन २०२६ च्या शिवजन्मोत्सवाच्या सचिवपदी सुधीर मोहनराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल रोमा पॅलेस हॉल येथे दि. १३ रोजी शनिवारी समितीचे अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
धाराशिव शहरात दरवर्षी भव्य स्वरूपात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी यावेळी नियोजनाची सुरुवात करण्यात आली. बैठकीदरम्यान सचिवपदासाठी सुचविण्यात आलेल्या सुधीर मोहनराव देशमुख यांच्या नावाला उपस्थित मार्गदर्शक मान्यवर, पदाधिकारी व शिवप्रेमींनी एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर अध्यक्ष आकाश कोकाटे यांनी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली.
निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी सुधीर देशमुख यांचे अभिनंदन करून पुढील शिवजन्मोत्सव अधिक भव्य, ऐतिहासिक व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष व नवनियुक्त सचिव यांनीही उपस्थितांचे आभार मानत शिवजन्मोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीस समितीचे अध्यक्ष श्री आकाश कोकाटे पदाधिकारी, श्री भालचंद्र कोकाटे ,अनंत जगताप, बळवंत घोगरे आदी मान्यवर तसेच धाराशिव शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Total views : 4449