लोकसंख्या इथे घटती..वाहणे मात्र वाढती.!
कुंडलवाडी / (उमाकांत गुंडाळे) : शहरात घटती लोकसंख्या आणि वाढती
वाहणे यामुळे आठवडी बाजारात
भाजीपाला खरेदी करणार्या पादचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बिलोली ते धर्माबाद कडे जाणारा रस्ता दुभाजक व रुंद प्लेन झाल्याने दुचाकी धारकासह मोठ मोठी वाहणे पण वगाने धाऊ लागत आहेत. यामुळे अपघात घडू शकतात. कुंडलवाडी सह सहभोवतालची खेडे गावातील खेडूत लोक ज्यांना हायवे वरुन कसे चालावे याचे ज्ञान नसते. म्हणून काम काजासाठी ये जा करणार्यांना रस्त्यावरुन चालण्याची सवय पण नसते. कारण अज्ञानपणा
हा पण कारणीभूत असतो. शहराच्या बाहेरुन जाणारा बिलोली – धर्माबाद या रस्त्यावर आंबेडकर नगर पासून ते श्री बसवेश्वर चौक चुंगी नाका या
रस्त्यावर निदान पाचतरी गतीरोधक
असणे गरजेचे आहे. याची जाणिव ठेवत शहरातुल युवकच गतिरोधक बसवत आहेत.आंबेडकर नगर कडे जाणार्या रस्त्यावर एक वळण आहे. त्या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या समोर जो शिवचौक आहे. तेथे पण तेथून शहरालगत असलेल्या के. रामलु ह्या इंग्रजी शाळेत दिड हजाराच्यावर विद्यार्थी
हे शिक्षण घेण्यासाठी ये जा करित असतात. त्यामुळे तिथे पण
गतीरोधकाची गरज आहे. काही विद्यार्थी व्हाॅनमधून, काही सायकलीवरुण, काही चालत तर काही आपल्या पालकांच्या दुचाकीवरुन शाळेत ये जा करतात.
तेव्हा एखादी दुर्घटना घडू नये म्हणून
गती रोधक बसविणे अगदी महत्वाचे
आहे. तरी यावर मंथन करुण खालील युवकांनी पुढाकार घेत स्वता: च गतीरोधक बसवून भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी,
शहरातील के. रामलू व्हाॅट्स
अँपस समुहाचे प्रमुख सयाराम मुक्केरवार, समाजसेवक साईनाथ भोकरे, एक सुजान युवक माधव लोलापोड, राजेश हामंद, शेख बाशिद, सैफ कुरेशी,व लखन नागूलवार, यांनीच गतिरोधक
बसवत आहेत.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 4449