इंदापूर येथील ‘भैरवनाथ शुगर’मध्ये उद्या मोळी पूजन; व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते होणार प्रारंभ
वाशी (प्रतिनिधी)- इंदापूर-वाशी कार्यक्षेत्रातील अग्रगण्य साखर कारखाना असलेल्या नरसिंह भैरवनाथ शुगर मिल्स च्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या, सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. भूम परंडा वाशीचे विधानसभा सदस्य माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. केशव (विक्रम) सावंत यांच्या हस्ते सकाळी ठीक १०:०० वाजता विधीवत ‘मोळी पूजन’ सोहळा पार पडणार आहे.
नरासिंह भैरवनाथ शुगरने यावर्षीच्या गळीत हंगामासाठी सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना परिसरात मंगलमय वातावरण असून प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला इंदापूर आणि वाशी परिसरातील:
प्रतिष्ठित नागरिक
ऊस बागायतदार व प्रगतशील शेतकरी
विविध संस्थांचे पदाधिकारी
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते
यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आग्रहाचे आवाहन व्हाईस चेअरमन विक्रम सावंत आणि कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल मिळावे आणि गळीत हंगाम यशस्वी व्हावा, या भावनेतून आम्ही सज्ज आहोत. या आनंद सोहळ्यात सर्व ऊस उत्पादक बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केशव उर्फ विक्रम सावंत (व्हाईस चेअरमन, भैरवनाथ शुगर) यांनी केले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
स्थळ: नरसिंह साखर कारखाना, इंदापूर.
दिनांक: २२/१२/२०२५ (सोमवार)
वेळ: सकाळी १०:०० वाजता
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 4449