तुळजापूर नगरपरिषद निवडणूकचा निकाल .
महाविकास आघाडीचे आनंद जगताप यांचा ३७८ मतांनी दणदणीत विजय .
सय्यद कलीम मुसा :
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद जगताप यांनी ३७८ मतांनी निर्णायक विजय मिळवला. अटीतटीच्या आणि शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत नागरिकांनी लोकशाहीवर विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणात मतदान केले.
या विजयाबद्दल आनंद जगताप यांनी तुळजापूरच्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. “हा विजय माझा वैयक्तिक नसून तुळजापूरच्या जनतेचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि संवेदनशील प्रशासन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांचे, कार्यकर्त्यांचे तसेच प्रशासनाचेही त्यांनी कौतुक केले. पराभूत उमेदवारांप्रती सहानुभूती व्यक्त करत, लोकशाहीत विजय–पराजय हे स्वीकारत एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निकालामुळे तुळजापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेत सकारात्मक, लोकाभिमुख आणि समन्वयात्मक कार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






















Total views : 4449