उपळाई येथे विभागीय महिला मेळावा संपन्न
इंडसइंड बँक व वॉटर’ संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा जागर
येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम अंतर्गत वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) कळंब आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच उपळाई ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मंगळवार, २३ डिसेंबर 2025 रोजी उपळाई येथे ‘विभागीय महिला मेळाव्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रकल्प क्षेत्रातील सुमारे ६२० महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मेळाव्याचे उद्घाटन नायब तहसीलदार गोकुळ भारडीया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपळाई सरपंच बापूसाहेब मुंडे,उपसरपंच बाबू भाई शेख, माजी पंचायत समिती सदस्य रामहरी मुंडे, ग्राम पंचायत सदस्या प्रियांका सुधाकर दराडे सूर्यभान भाऊ फावडे, राहूल शेंडगे,कळंबच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे, येरमाळा एपीआय संग्राम भालेराव, तालुका उप कृषी अधिकारी भुजंग लोकरे, धाराशिव संपदा ट्रस्टच्या उज्वला कवठेकर, विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंखे, मंडळ कृषी अधिकारी मारुती ओव्हाळ, WOTR धाराशिव चे आदेश ठोंबरे, सहाय्यक कृषी अधिकारी नाईकवाडे, निकम मॅडम, कृषी अधिकारी तुफान खोत, मोटे बी बी, प्रोजेक्ट मॅनेजर अनिल वांडेकर, मनेश फंदे, संदीप बारखडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विकासाचा आढावा आणि मार्गदर्शन
उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना वॉटर संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. महिलांचा इतका मोठा सहभाग पाहून अतिथींनी आनंद व्यक्त केला आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि सहभाग हाच खऱ्या विकासाचा कणा असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोशल ऑफिसर संदीप बारखडे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन साहिल तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनेश फंदे यांनी मानले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट मॅनेजर अनिल वांढेकर सर, मनेश फंदे सोशल ऑफिसर, संदीप बारखडे सोशल ऑफिसर, आशुतोष शिंदे, सागर हाडे, प्रियदर्शनी कांबळे, महेश माळी, अक्रोड जाधव, बालाजी लाटे यांच्यासह सर्व महिला प्रवर्तक आणि वसुंधरा सेवकांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यामुळे कळंब तालुक्यातील परिसरातील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.




















Total views : 4448