कांदलगाव–सिरसाव येथे शोकसंतप्त कुटुंबाची सांत्वनपर भेट
जवळा गटातील मौजे कांदलगाव व सिरसाव येथे चौबे व जाधव परिवारावर आलेल्या दुःखद प्रसंगानंतर मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. धनंजय दादा सावंत यांनी संबंधित कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधत दुःखात सहभागी होत आधाराचे शब्द दिले. “दुःखाच्या प्रसंगी समाज एकत्र उभा राहणे हीच खरी माणुसकी आहे,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.
शोकाकुल वातावरणात ही भेट अत्यंत भावनिक ठरली. उपस्थित ग्रामस्थांनीही या संवेदनशील भेटीचे स्वागत केले.





















Total views : 4449