पत्रकारिता ही समाजाचा आरसा – केशव सावंत
वाशी :
आज दि. ०७/०१/२०२६ रोजी भैरवनाथ शुगर युनिट, वाशी येथे माजी आरोग्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बंधूंचा दर्पण (पत्रकार दिन) निमित्त सन्मान करण्यात आला. दैनंदिन धावपळीमुळे राहिलेला हा सन्मान सोहळा भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन केशव सावंत यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी पत्रकार बंधूंना शाल, श्रीफळ व लेखणी अस्त्र असलेला पेन देऊन गौरविण्यात आले. समाजातील घडामोडी निष्पक्षपणे मांडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे केशव सावंत यांनी सांगितले. सत्य, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक भान जपणारी पत्रकारिता ही लोकजागृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार बंधूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पत्रकारितेप्रती समाजाचा आदरभाव अधोरेखित झाला. कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





















Total views : 4449