जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय सावंत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरवार..!!
➡️माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. दूरदृष्टी, अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे धनंजय सावंत हे नाव कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण करत आहे.
सामाजिक व प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी यापूर्वीही प्रभावी कामकाज केले असून, त्याचीच पावती आज त्यांच्या पाठीशी उभी असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी देत असल्याचे चित्र दिसत आहे. गावोगावी कार्यकर्त्यांमध्ये हालचालींना वेग आला असून, “धनंजय सावंत म्हणणारा मोठा वर्ग” सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
या बातमीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागल्याचे संकेत मिळत आहेत. संघटन मजबूत करत सावंत पुन्हा एकदा प्रभावी भूमिका बजावणार, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 4448