धाराशिव जिल्ह्याला राज्यात मानाचे स्थान मिळवुन देणारे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार..
धाराशिव :- महाराष्ट्र शासनाच्या
150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात विशेष मोहिमे अंतर्गत एकूण दोन टप्यांतील मुल्य मापनानंतर राज्यातील 36 जिल्हाधिकारी कार्यालया मधुन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात तृतीय क्रमांकाने निवडण्यात आले आहे.150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ या अंतर्गत उत्कृष्ट केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी किर्तीजी किरण पुजार साहेब यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,धाराशिव जिल्ह्याला यापुर्वीही चांगले अधिकारी मिळाले आणि मिळतील देखील परंतु काही अधिकारी धाराशिव करांच्या मनात कोरले जातात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाकजी घोष साहेब यांनी ही चांगल्या प्रकारे कार्य करीत एकीकडे वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजुला ठेवून पुरग्रस्तांसाठी मदतीला धावून धाराशिव करांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. जिल्हाधिकारी,सिईओ,एसपी यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन धाराशिवचे महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान मिळविले.असे अधिकारी परत धाराशिव जिल्ह्याला मिळणार नाहीत.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार साहेब यांचे नियोजनबद्ध कार्य हे नक्कीच कौतुकास्पद असुन व सिईओ डॉ मैनाक घोष साहेब,एसपी रितु खोखर मॅडम सह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांचे मनपुर्वक अभिनंदन करुन शुभेच्छा देतोत,अशा प्रकारे शुभेच्छा संदेशात सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी म्हटले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 7582