• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 30, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

गुटखाबंदीच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये ठिय्या आंदोलन; प्रशासनाला दिला कडक इशारा

Sayyad Musa by Sayyad Musa
March 30, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

गुटखाबंदीच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये ठिय्या आंदोलन; प्रशासनाला दिला कडक इशारा

बाहेरून येणाऱ्या गुटख्यावर तात्काळ बंदी घाला; अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा

धाराशिव : जिल्ह्यात गुटख्याच्या वाढत्या अवैध वाहतूक आणि विक्रीविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आज (दि. 30 मार्च) अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला थेट इशारा दिला. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर आणि जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. शासनाने स्पष्ट बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेले व्यसन हे समाजासाठी धोकादायक ठरत असल्याचे संघटनेने अधोरेखित केले. गुटख्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. “गुटखा बंदी फक्त कागदावरच आहे का?” असा थेट सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आल्या. बाहेरून येणारा गुटखा पूर्णपणे रोखण्यात यावा, संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यासोबतच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. संबंधित निवेदनाची दखल घेत प्रतिबंधित अन्नपदार्थांवर तात्काळ धाडी व जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आले. या पत्रावर अधिकारी प. द. इंबडे यांची स्वाक्षरी असून कारवाईला प्राधान्य दिले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी “कारवाई झाली नाही तर यापुढे आणखी तीव्र आणि मोठे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात परिणामकारक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात महिला आणि युवक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. समाजाच्या आरोग्याच्या प्रश्नावर एकवटलेली ही ताकद प्रशासनासाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे.

एकूणच, धाराशिव जिल्ह्यात गुटखाबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन आता कितपत तत्परतेने कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्याला राज्यात मानाचे स्थान मिळवुन देणारे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार..

Next Post

अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संघटनांचा एल्गार; प्रशासन झोपेत की संगनमतात?

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संघटनांचा एल्गार; प्रशासन झोपेत की संगनमतात?

धाराशिव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निरोप तर उत्कृष्ट कार्य करणा-या कर्मचाऱ्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

May 29, 2026

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

May 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007999
Total views : 12818

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In