ईट तालुका भूम येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन कार्यसम्राट आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या शुभहस्ते आज आयोजित “भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या” लोगो व प्रसिद्धी पत्रकाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या भव्य स्पर्धेमुळे राज्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या नृत्य स्पर्धेचे स्वरूप अत्यंत व्यापक असून यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नामवंत स्पर्धक आपला कलाविष्कार सादर करण्यासाठी सहभागी होणार आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजकांच्या वतीने अत्यंत आकर्षक आणि मोठ्या स्वरूपाची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुप्त गुणांना वाव देण्याचा संकल्प आयोजकांनी यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल डोके, विशाल ढगे, सुनील भोईटे, निलेश शेळवणे, समाधान सातव, युवराज हुंबे, समाधान भोरे, युवराज तांबे, चंद्रकांत सरडे यांसह आयोजक प्रवीण देशमुख व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















Total views : 7882