“आई म्हणजे त्याग, संस्कार आणि प्रेमाचा अखंड झरा” — आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत:-
प्रतिनिधी |
“मायेच्या स्पर्शाने आयुष्याला अर्थ मिळतो, त्यागाच्या छायेत संसार फुलतो आणि आईच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद मिळते,” अशा भावपूर्ण शब्दांत भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी जागतिक मातृदिनानिमित्त मातृत्वाला अभिवादन केले.
आई ही केवळ जन्मदात्री नसून कुटुंबाची खरी शक्ती, संस्कारांची पहिली शाळा आणि निस्वार्थ प्रेमाचा अखंड झरा आहे. तिच्या मायेची ऊब, संघर्षातील साथ आणि प्रत्येक यशामागील तिचे त्यागमय योगदान हे प्रत्येकाच्या आयुष्यात अनमोल स्थान राखून आहे, असेही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले.
“आई” ही आयुष्यातील प्रत्येक संकटात धीर देणारी शक्ती, प्रत्येक आनंदामागचं खरं कारण आणि ममतेचं सर्वात सुंदर रूप आहे. तिच्या आशीर्वादामुळेच आयुष्य अधिक सुंदर, सक्षम आणि प्रेरणादायी बनते, असे गौरवोद्गारही आ. डॉ. सावंत यांनी काढले.
जागतिक मातृदिनानिमित्त त्यांनी सर्व मातृतुल्य माता-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देत मातृत्वाच्या त्याग, प्रेम आणि संस्कारांना विनम्र अभिवादन केले.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 12295