कळंब येथे संपन्न झालेला निकाह सोहळा ठरला सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश
कळंब : शहरातील प्रतिष्ठित परिवारातील नेहा अख्तर मिर्झी व मो. बिलाल इक्बाल मुजावर यांच्या मंगलमय निकाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आनंद, उत्साह आणि पारंपरिक वातावरणात पार पडलेल्या या निकाह सोहळ्यात उपस्थितांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी व्हाईस चेअरमन केशव सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नवदांपत्याला शुभाशीर्वाद देत त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीच्या सदिच्छा व्यक्त केल्या. अल्लाहच्या कृपेने त्यांच्या संसारवेलीवर आनंदाची फुले सदैव फुलत राहोत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
निकाह सोहळ्याचे आयोजन अत्यंत नेटके व आकर्षक करण्यात आले होते. नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. सर्वधर्मीय बांधवांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक सलोखा आणि ऐक्याची विशेष किनार लाभली.
समारंभात पाहुण्यांच्या स्वागताची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पारंपरिक रितीरिवाज आणि धार्मिक विधींच्या साक्षीने संपन्न झालेला हा निकाह सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.























Total views : 12314