जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व – उद्धव साळवी यांचा वाढदिवस उत्साहात
भूम-परंडा-वाशी तालुक्याचे भाग्यविधाते, विकासरत्न कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब तसेच डीसीसी बँक संचालक, भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन केशव सावंत साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मा. जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना समन्वयक वाशी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उद्धव साळवी यांचा वाढदिवस विविध स्तरातून शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे.
राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे नेतृत्व म्हणून उद्धव साळवी यांची ओळख निर्माण झाली आहे. वाशी तालुक्यात शिवसेनेची संघटनबांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी लोकसंपर्काचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12314