वाशी पंचायत समितीच्या नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार
तालुक्याच्या विकासासाठी नव्या संकल्पनांवर सकारात्मक चर्चा
वाशी पंचायत समितीचे नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकारी यांची व्हॉइस चेअरमन यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पहार व शाल देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्या पुढील प्रशासकीय कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान वाशी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविता येणाऱ्या नव्या संकल्पना, लोकहिताच्या योजना तसेच विकासकामांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, प्रशासनातील समन्वय आणि नागरिकाभिमुख कामकाज अधिक प्रभावी करण्याबाबत सकारात्मक विचारमंथन झाले.
युवराज मिरजकर यांच्या सक्षम नेतृत्वातून वाशी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट, वाशी नगरपंचायत गटनेते नागनाथ बापू नाईकवाडी, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, उद्धव साळवी, राहुल आडमुटे, सहायक अभियंता पावरा साहेब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.





















Total views : 12318