गिरीराज सावंत यांची धाराशिव शिष्टमंडळासोबत विकास विषयांवर चर्चा
JSPM कात्रज कार्यालयात सदिच्छा भेट; विविध प्रश्नांवर सकारात्मक संवाद
पुणे, प्रतिनिधी :
पुण्यातील JSPM कात्रज कार्यालयात कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक तथा युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले गिरीराज (भाऊ) सावंत यांची धाराशिव जिल्ह्यातील शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध विकासकामे, युवकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम तसेच आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नेतृत्वाशी संवाद साधताना शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी विविध विषय मांडले. यावेळी गिरीराज सावंत यांनी उपस्थितांच्या भावना जाणून घेत विकासकामांना गती देण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली.
या प्रसंगी युवासेना सहसंघटक प्रशांत हजारे, कळंब तालुका प्रमुख विश्वर शिंदे, मंगरुळ जिल्हा परिषद संपर्कप्रमुख अर्जुन कोल्हे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भेटीदरम्यान संघटनात्मक बांधणी, युवकांचा सहभाग वाढविणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबतही चर्चा झाली.
धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व विकासात्मक प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या युवा नेतृत्वाशी झालेल्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.



















Total views : 12315