तुळजापूर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील कामांची पाहणी
राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांनी आज तुळजापूर येथे श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीच्या मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.
तुळजापूर येथील भवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासह मंदिर परिसराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामाची प्रगती आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधित उपक्रमांची पाहणी मा. मंत्री महोदयांनी केली.
या प्रसंगी राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, श्री. नेताजी पाटील, श्री. सज्जनराव साळुंके, श्री. आनंद कंदले, सौ. रंजनाताई राठोड, श्री. अमरराजे परमेश्वर, श्री. संदीप गंगणे तसेच इतर शासकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















Total views : 4448