तेर (प्रतिनिधी): राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार साहेब यांचे आज ऐतिहासिक तेर नगरीत आगमन झाले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी संत गोरोबा काका मंदिर समितीच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
यानंतर मा. शेलार साहेबांनी संत गोरोबा काका मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. तसेच तेर येथील ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
यावेळी त्यांनी कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट देऊन तेथील सातवाहन काळातील मातीच्या मूर्ती, नाणी, शिल्पकला, प्राचीन दैनंदिन वापरातील वस्तू आणि ऐतिहासिक पुराव्यांची पाहणी केली.
तेर नगरीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या या वस्तुसंग्रहालयाच्या कामकाजाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी श्री. नेताजी पाटील, सौ. अस्मिताताई कांबळे, श्री. नितीन भोसले, श्री. दत्ता देवळकर, श्री. बाळासाहेब खांडेकर, श्री. पद्माकर फंड, सौ. दीदी काळे, श्री. बंडू फंड, श्री. नवनाथ नाईकवाडी, श्री. प्रवीण साळुंके, श्री. रमेश भोसले, श्री. गोपाळ कदम, श्री. अतिश फंड यांच्यासह तेर येथील प्रमुख नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
ऐतिहासिक तेर नगरीत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांचे आगमन
( सय्यद कलीम मुसा )
तेर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. आशिषजी शेलार यांचे आज ऐतिहासिक तेर नगरीत आगमन झाले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी संत गोरोबा काका मंदिर समितीच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
यानंतर मा. शेलार साहेबांनी संत गोरोबा काका मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. तसेच तेर येथील ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
यावेळी त्यांनी कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयास भेट देऊन तेथील सातवाहन काळातील मातीच्या मूर्ती, नाणी, शिल्पकला, प्राचीन दैनंदिन वापरातील वस्तू आणि ऐतिहासिक पुराव्यांची पाहणी केली.
तेर नगरीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या या वस्तुसंग्रहालयाच्या कामकाजाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी श्री. नेताजी पाटील, सौ. अस्मिताताई कांबळे, श्री. नितीन भोसले, श्री. दत्ता देवळकर, श्री. बाळासाहेब खांडेकर, श्री. पद्माकर फंड, सौ. दीदी काळे, श्री. बंडू फंड, श्री. नवनाथ नाईकवाडी, श्री. प्रवीण साळुंके, श्री. रमेश भोसले, श्री. गोपाळ कदम, श्री. अतिश फंड यांच्यासह तेर येथील प्रमुख नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Total views : 4448