तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकच ध्येय — विनोद पिटू भैय्या गंगणे यांचे नेतृत्व
➡️ त्यांच्या कार्यशैलीत गोडवा, संवाद आणि तळमळ या तीन गोष्टी ठळकपणे दिसून येतात.
तुळजापूर │ सय्यद कलीम मुसा ‘
तुळजापुर शहरात गेल्या काही वर्षांत सामाजिक सलोखा, व्यापारी हित आणि धार्मिक परंपरेचे जतन या तिन्ही आघाड्यांवर काम करणारे विनोद (पिटू भैय्या) गंगणे हे नाव आज प्रत्येक नागरिकाच्या चर्चेत आहे. जनतेचा विश्वास आणि सहकार्य हीच आपली खरी संपत्ती मानणारे गंगणे यांनी पुजारी, व्यापारी, तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सातत्याने काम केले आहे.
शहरातील धार्मिक परंपरेचा आत्मा जपताना व्यापारवर्गाच्या अडचणींना शासनदरबारी आवाज देणारे गंगणे यांनी सर्व धर्म, समाज आणि घटकांना सोबत घेऊन विकासाचे सूत्र राबवले आहे. त्यांच्या कार्यशैलीत गोडवा, संवाद आणि तळमळ या तीन गोष्टी ठळकपणे दिसून येतात.
स्थानिक पातळीवर अनेक व्यापारी संघटना, सामाजिक मंडळे आणि सेवा संस्थांनी त्यांना पाठिंबा दर्शवला असून,
नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांपासून ते धार्मिक सण-उत्सवांच्या आयोजनापर्यंत — प्रत्येक ठिकाणी गंगणे स्वतः पुढाकार घेताना दिसतात. शहरातील तरुणांना रोजगार, महिलांना स्वावलंबन, आणि पुजारी वर्गाला सन्मान मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
“जनतेचे हित आणि शहराचा विकास हीच माझी राजकारणाची दिशा आहे. कोणाच्याही विरोधासाठी नव्हे, तर सर्वांच्या सहकार्याने प्रगतीसाठी काम करण्यावर माझा विश्वास आहे,” असे गंगणे यांनी सांगितले.तुळजापुरचा इतिहास आणि परंपरा जपून आधुनिकतेकडे वाटचाल करणारे शहर घडवण्याचे त्यांचे ध्येय आहे.त्यामुळेच, तुळजापुरातील नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे —
“भावी नगराध्यक्ष म्हणून योग्य आणि जनतेचा माणूस — विनोद पिटू भय्या गंगणे!”
कोट : –
“तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नवे नेतृत्व म्हणून विनोद पिटू भय्या गंगणे” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.





















Total views : 4449