तुळजापूरात परिवर्तनाच्या चर्चांना आला जोर ; सामाजिक कार्यामुळे ‘पिंटू गंगणे’ च्या नावाची चर्चा .
तुळजापूर – सय्यद कलीम मुसा.
तुळजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून परिवर्तनाची चर्चा वेग घेताना दिसत आहे. स्थानिक विकास, नागरी प्रश्न आणि दैनंदिन अडचणी याबाबत नागरिकांमध्ये नवीन नेतृत्वाबद्दल अपेक्षा निर्माण होत असून “बदल होणं आवश्यक आहे” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
शहरातील काही नागरिकांशी संवाद साधला असता, सामाजिक बांधिलकी आणि तत्पर कार्यशैलीमुळे पिंटू गंगणे यांचे नाव चर्चेत असल्याचे अनेकांनी नमूद केले. कोणतेही काम अथवा समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांना “पिंटू भैया” म्हणून ओळख मिळाल्याचेही नागरिक सांगतात.
शहरात कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक किंवा कुटुंबीय प्रश्न उद्भवल्यास त्यांनी तातडीने हातभार लावला असल्याची चर्चा सुरू आहे. “ते आमच्या समाजातील आणि परिसरातील एक जबाबदार सदस्य आहेत” असे काही नागरिकांनी सांगितले. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक लहान–मोठे प्रश्न सोडवले गेल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली.
दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही विशिष्ट राजकीय प्रचारापासून दूर राहत, ही चर्चा फक्त सामाजिक कार्याच्या अनुषंगाने असल्याचे स्थानिक स्तरावरून सांगण्यात येत आहे.
तुळजापूर शहरात वाढत्या चर्चेमुळे वातावरणात परिवर्तनाच्या मागणीची छाया अधिक स्पष्टपणे उमटताना दिसत आहे.





















Total views : 4449