“तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जल्लोष ; अमर मगर यांच्या नावाने निवडणूकीच्या वातावरण रंगत ”
तुळजापूर – प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमर अशोकराव मगर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोर येताना दिसत आहे. शहरातील विविध भागांत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणूक प्रक्रियेला वेग येत असल्याचे चित्र उमटत आहे.
संस्थानिकाशी निष्ठा जपणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या योजनांची अपेक्षा व्यक्त केली. निवडणूक आचारसंहितेचा आदर राखत शांत, संयमी आणि नियमबद्ध पद्धतीने प्रचारकार्य सुरू असल्याचेही ते म्हणाले.
निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या चर्चांमधूनही स्थानिक स्वराज्य संस्थेतील पुढील नेतृत्वाबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे.





















Total views : 4449