डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कसबे तडवळे येथील जि. प.शाळांचे यश
३ मुली व २ मुलांची विभाग स्तरावरील परीक्षेसाठी निवड
मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेची लेखी परीक्षा ८ नोव्हेंबर २५रोजी झाली होती. सहावी वर्गातील विज्ञान विषयासाठी होणाऱ्या या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे शाळेतील १५ विद्यार्थी तर जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळा शाळेतील १७ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. या मध्ये कन्या शाळेतील मृत्युंजया महेश लांडगे,बुद्धप्रिया अमोल सोनटक्के,आश्लेषा किरण शिंदे तर केंद्रीय शाळेतील सोहम नामदेव जमाले व आर्यन उमेश पंडीत या पाच विद्यार्थ्यांची विभाग स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे.तसेच कन्या शाळेतील अक्षरा लोमटे,मानसी करंजकर,वैष्णवी गडकर,प्राची सिरसट,स्वराली करंजकर,वैष्णवी हावळे,मानसी होगले,वैष्णवी जमाले,आलिया शेख,समृद्धी पानढवळे,अक्षता बिक्कड,श्रेया शेळके,वैष्णवी जगदाळे,श्रद्धा डोलारे तर केंद्रीय शाळेतील जिशान शेख,सुमित डुमणे,सार्थक वाकळे,कृष्णा कदम,सोहम करंजकर,प्रतिक शिंदे,कृष्णा चव्हाण,रमजान कोरबू,भारत मैदांड,आयुष पवार,वेदांत गोरे,रणवीरसिंह कोकाटे,यशराज मिसाळ हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक बाळासाहेब जमाले ,विज्ञान पदवीधर ऋषीकेश पवार ,हेमलता चांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.विज्ञान परीक्षेतील या यशाबद्दल विस्ताराधिकारी किशोरी जोशी, केन्द्रप्रमुख जगदीश जाकते, केंद्रीय शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पवार,कन्या शाळेचे अध्यक्ष सोमनाथ भोसले मुख्याध्यापक केशव पवार ,कन्या शाळा मुख्याध्यापक रहिमान सय्यद,ज्येष्ठ जगन्नाथ धायगुडे, पांडुरंग तनमोर व मोहम्मद नदाफ यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.





















Total views : 4449