मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत
औसा तालुक्यातील उटी (बु )
येथे ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप ,
उटी बु येथे महत्त्वपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत उटी येथे आज दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल विभागाच्या सहकार्याने विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते , या कॅम्पमध्ये इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले प्राप्त करून उटी गावातच वाटप करण्यात आले.
सदर कॅम्पचे आयोजन तहसील कार्यालय, औसा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, या कॅम्पच्या माद्यमातुन महसुल विभागांतर्गत विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व महसुल च्या योजनेचे महत्व ग्रामस्थांना सांगण्यात आले , यावेळी श्रीमती प्रियंका बोरकर, निरीक्षण अधिकारी (पुरवठा), तालुका औसा यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले सुलभरीत्या उटी गावातच मिळाल्याने विद्यार्थी पालक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.यावेळी ,
उटी बु गावच्या सरपंच वैशालीताई कांबळे, उपसरपंच रफिक शेख, ग्रामपंचायत अधिकारी महेश जगताप,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महालिंग स्वामी, गुंडू भोकरे, अमर उबाळे, लक्ष्मण घोडके तसेच तहसील कार्यालयाचे प्रियंका बोरकर निरीक्षण अधिकारी पुरवठा तालुका औसा मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते




















Total views : 4448