छावा मराठा संघटनेच्या वतीने मा. उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर. यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यात संघटनेची खालील प्रमाणे मागणी मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावे स्वतंत्र मराठवाडा आर्थिक विकास महामंडळ त्वरित राज्य शासनाने स्थापन करण्यात यावे., उदगीर येथे छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, व तसेच अहमदपूर वाढवणा पाटील मार्गे आयुर्वेद रित्या विना नंबर हायवा टिप्पर द्वारे आयुर्वेद वाळू वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवला जातो या वाळू माफियावर त्वरित निर्बंध लादून योग्य ती कारवाई करण्यात यावी. व वाढवणा बु. हळी परिसरातील आयुर्वेद रित्या चालत असलेले मटका जुगार तिरट पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करून योग्य ती जुगार चालकावर कारवाई करावी, उदगीर नगरपरिषद कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर लोखंडी कंपाउंड वॉल असून ते अत्यंत धोकादायक असून लहान मुले व्रत नागरिक व महिलांसाठी खूपच धोकादायक असल्यामुळे एखाद्याचा तोल जाऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सदर लोखंडी कंपाउंड वॉल पूर्णता तारेची जाळी बसविण्यात यावी, व तसेच सध्या परिस्थितीत उदगीर शहरात होत असलेल्या आशिष वाहतूक होत असून चौकात चौकामध्ये उदगीर शहरात ट्राफिक जाम होत आहे यावर शासनाने निर्बंध लादण्यात यावे व वाहतूक सुरळीत करण्यात यावे यासाठी छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष विशाल देवणे जिल्हाध्यक्ष उत्तम बिरादार, राहुल पाटील, गणेश मुंडकर, एस एस न्यूज चैनल चे संपादक हमीद भैया शेख, मनोहर वाघमारे, बाबासाहेब सूर्यवंशी, सुनील पाटील, आसिफ पठाण, सिकंदर शेख, बापूसाहेब कांबळे, टी एम पंढरपूरे, अजय बिरादार यांच्या उपस्थितीत माननीय उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब यांना निवेदन देऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दिनांक 30 12 2025 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर छावा मराठा संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला..






















Total views : 4448