धाराशिव नगरपरिषदेत मल्हार पाटील ठरले ‘किंगमेकर ’!!
नगराध्यक्षांसह २२ नगरसेवक निवडून आणण्यात निर्णायक भूमिका .
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव नगरपरिषदेच्या राजकारणात युवा नेते मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव सध्या केंद्रस्थानी आले असून, नगराध्यक्षांसह तब्बल २२ नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
निवडणूकपूर्व नियोजन, प्रभागनिहाय अचूक गणिते आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क यामुळे नगरपरिषदेत सत्तासमीकरण बदलल्याचे चित्र दिसून आले. या घडामोडींमुळे आमदार व खासदार पातळीवरील पारंपरिक राजकीय प्रभाव अपेक्षित ठरला नाही, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मल्हार पाटील यांनी निवडणूक काळात कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवत संघटनात्मक ताकद उभी केली. शहरातील नागरी प्रश्न, स्थानिक विकास आणि थेट संवाद या मुद्द्यांवर आधारित रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिपाक म्हणजे नगराध्यक्ष पदासह २२ नगरसेवकांवर प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
धाराशिव शहरात सध्या “नगरपरिषद कुणाच्या हातात गेली?” यापेक्षा “नगरपरिषद घडविण्यामागे कुणाची रणनीती होती?” हा प्रश्न अधिक चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व म्हणून मल्हार पाटील यांची भूमिका भविष्यातील शहर राजकारणात अधिक महत्त्वाची ठरणार, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.





















Total views : 4449