मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेत नंदिध्वज निमित्त मिरवणूक .
➡️ श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या यात्रे निमित्त नंदिध्वज मिरवणूक काढण्यात आली.
दैनिक गिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : – उत्तर सोलापूर तालुक्यातील संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथे सालाबाद प्रमाणे या ही वर्षी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या यात्रे निमित्त नंदिध्वज मिरवणूक काढण्यात आली.सर्वप्रथम श्री सिद्धेश्र्वर सहकारी बँकेचे तज्ञ संचालक ऍड. धानय्या चिवरी यांच्या हस्ते श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज व बारा ज्योतिर्लिंग यांच्या फोटोंचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अशोक लांबतुरे, सचिव मधुकर गवळी,मुख्याध्यापिका सौ रुक्मिणी गवळी, ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब लोखंडे, महादेव करे, तानाजी तानगावडे ,अशोक देशमुख, विनोद कोळेकर, अमोल गुरव, बसवराज तुळजापूरे, संदिप चव्हाण व विदयार्थी इ. उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या परिसरातून आकर्षक मैदानाची सजावट करुन चटई अंथरून फुलांच्या पायघड्या घालून श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . शाळेतील विद्यार्थ्यानी पारंपारिक बाराबंदी पोषाख, मानाचे मानकरी यांची वेशभूषा करुन मिरवणुकीची शोभा वाढवली. श्री शिवयोगी सिद्धेश्र्वर महाराज की जय, हर बोला हर च्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. बाल चिमुकल्यांच्या मनामध्ये आतापासूनच धार्मिक भाव,भक्ती,पारंपारिक सण उत्सव याची जाणीव व्हावी, ही मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत जोपासून रहावीत हा उद्देश समोर ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कोळेकर यांनी केले तर आभार तानाजी तानगावडे यांनी मानले.




















Total views : 4448