लोकविश्वासाचा कौल : गिरीराज सावंत यांना मोठे जनसमर्थन – गंगाधर नाना काळे पाटील
धखनवाडी : राज्याचे मा. मंत्री. आमदार. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुत्र तथा युवा नेतृत्व मा. गिरीराज सावंत यांना मिळत असलेला व्यापक जनसमर्थन हा जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट प्रतीक ठरत आहे. विविध सामाजिक घटक, युवक वर्ग आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.
राजकीय क्षेत्रात संयमित भूमिका, लोकांशी थेट संवाद आणि विकासकेंद्री विचारधारा यामुळे गिरीराज सावंत यांना सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कोणताही आचारसंहितेचा भंग न होता, लोकशाही मूल्यांचे पालन करत त्यांनी जनसंपर्क ठेवला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सामाजिक समतोल, स्थानिक प्रश्नांबाबतची जाण आणि जबाबदारीची भूमिका यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, हा विश्वास भविष्यातील राजकीय वाटचालीस बळ देणारा ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.




















Total views : 4448