आदीशक्ती अभियान मध्ये ग्रामपंचायत धनकेश्वर ला तालुकास्तर व जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कारसाठी निवड
कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
पुसद पंचायत समिती अंतर्गत असलेल्या धनकेश्वर ग्रामपंचायतीची ८/४/२०२६ रोजी विभागीय स्तरीय आदीशक्ती समिती अमोल डिगुळे – छजिल्हा महिला व बालविकास अधिकारी,बुलढाणा. आनंद जाधव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (विभागीय उपायुकत कार्यालय, अमरावती).अमोल मेरगळ- बालविकास प्रकल्प अधिकारी दर्यापूर, अमरावती यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीने या अभियाना मध्ये आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन,सुरक्षा, हुंडा प्रथा प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, वृक्ष लागवड,कुपोषण मुक्ती,अनेमिया मुक्ती,कौटुंबिक हिंसाचार मुक्ती या घटकावर केलेल्या कामाची तपासणी करण्यात आली आणि आदिशक्ती अभियाना बाबत मागदर्शन केले. कापडी पिशवीचा वापर वाढविण्यासाठी नागरिकांना कापडी पिशवीचे वितरण विभागीय स्तरीय समिती मार्फत करण्यात आले तसेच सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी कार्यालय, परसबाग ची पाहणी करण्यात आली अभियाना मध्ये केलेली कामे पाहून समितीने समाधान व्यक्त केले समिती सोबत संजय राठोड सहाय्यक गटविकास अधिकारी पं स पुसद, धिरज आडे गटशिक्षण अधिकारी, चिंचणे साहेब महिला बालविकास अधिकारी, संतोष डाखोरे विस्तार अधिकारी पंचायत विभाग पुसद , शेख साहेब ,डॉ श्रीकांत इंगळे, सहाय्यक संरक्षण अधिकारी, मो सादिक जियाउल्हक सरपंच, सौ शोभा धुमाळ उपसरपंच,भारत गरड ग्रा पं अ, विजय इसलकर ग्रा पं अ, ए बि जाधव ग्रा पं अ, किरण देशमुख ग्रा पं अ, साखरे ग्रा पं अ, मुडे ग्रा पं अ,जयंत साखरे ग्रा पं अ, साखरे ग्रा पं अ, अनिल काकडे ग्रा पं अ, बि आर चव्हाण ग्रा पं अ, वाजीद सर मुख्याध्यापक,वर्षा इंगोले तलाठी, रंजना वाढवे अध्यक्ष आदी शक्ती समिती,सनी देशमुख ग्रा स,शेख आदिल ग्रा स, बेबीनंदा काळे ग्रा स, सुनीता पुंडे ग्रा स, शिला मस्के ग्रा स,सतीश पडघणे ग्रा स, संध्या मानकर अंगणवाडी सेविका, साहेबराव जाधव, मंदा टोहणे, दत्ता नीलकंठे, शेषराव बोखारे, रवी वाढोणकर,महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमित बोजेवार विस्तार अधिकारी शिक्षण यांनी केले





















Total views : 13915