वाकडी येथे वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न
वाकडी : येथील श्री. सुदाम वैजिनाथ वळेकर यांच्या निवासस्थानी आयोजित वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा धार्मिक वातावरणात आणि भक्तिमय उत्साहात संपन्न झाली. यावेळी धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी उपस्थित राहून वळेकर परिवारास शुभेच्छा दिल्या.
सर्वसामान्य कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये मिसळून आपुलकीने संवाद साधणारे नेते म्हणून धनंजय दादा सावंत यांची ओळख असून, कार्यक्रमस्थळी त्यांनी उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारत सर्वांची विचारपूस केली. त्यांच्या साध्या व प्रेमळ स्वभावामुळे नागरिकांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वळेकर परिवाराच्या नव्या वास्तूसाठी शुभेच्छा व्यक्त करत सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 12296