सर्वसामान्यांच्या हक्कासाठी झटणारं नेतृत्व; भूम-परंडा-वाशीच्या विकासाचा ध्यास घेणारे आमदार डॉ. तानाजीराव सावंत
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे आज जनतेच्या हक्कासाठी लढणारे आणि संकटात धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यावर विशेष भर दिला. परंडा येथे आयोजित करण्यात आलेले भव्य महाआरोग्य शिबिर हे त्यांच्या जनहितवादी भूमिकेचे मोठे उदाहरण ठरले. या शिबिरामधून भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील तब्बल ३ लाख ७ हजार रुग्णांनी मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घेतला.
सामान्य कुटुंबातून पुढे येत केवळ जनतेच्या प्रेमावर, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मतदारसंघातील विकासकामे, जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरत आहे.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करताना त्यांनी विकासाची वेगळी दिशा दिली आहे. सर्वसामान्यांच्या वेदना जाणून त्यांच्या अश्रूंना आधार देणारे नेतृत्व म्हणून कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्याकडे पाहतात.
“विकासासाठीचा ध्यास आणि जनतेसाठी कायम धावून जाण्याची वृत्ती हीच डॉ. सावंत यांची खरी ताकद आहे,” अशा भावना मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12314