दावतपूर गावात जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीची सदिच्छा भेट…….
जे जे नव ते ते दावतपूर गावला हवं. या वाक्यप्रमाने दावतपूर
गावचा सर्वांगीण विकास करणार उपसरपंच विठ्ठलराव बेडजावळगे यांचे प्रतिपादन….
औसा तालुक्यातील दावतपूर
गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय, दावतपूर.येथे जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने सदिच्छा भेट दिली. ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, प्रशासकीय कामकाज आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांची समितीकडून सखोल पाहणी करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान समितीचे आदरणीय सदस्य:
श्रीम. वैदेही रानडे (भा.प्र.से.) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी
व श्री. सागर पाटील – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.), जि.प. रत्नागिरी
श्री. मल्लीनाथ कांबळे – जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.का.), जि.प. रत्नागिरी
या सर्वांनी ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल आणि विकासकामांबद्दल पूर्ण समाधान व्यक्त करून आमचा गौरव केला. समितीने दिलेली ही सकारात्मक पोचपावती आणि कौतुकाची थाप दिल्याने आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
मौल्यवान वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल आणि कामावर समाधान व्यक्त केल्याबद्दल आम्ही संपूर्ण दावतपूर
ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने मूल्यांकन समितीचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले दावतपूर गावचा
हा गौरव गावातील प्रत्येक घटकाच्या सहभागामुळेच शक्य झाला आहे..भविष्यातही .दावतपूर गावाला अधिक प्रगत आणि आदर्श बनवण्यासाठी आम्ही असेच कटिबद्ध राहू. व यापुढेही मोठी गावचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट जोपासू..यावेळी
औसा पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे. सहाय्यक गटविकास अधिकारी शैलेश बिराजदार.. जिल्हा परिषद लातूर गटविकास अधिकारी कानडे साहेब.. विस्तार अधिकारी बालाजी तेलंग. . सरपंच शिवादास कांबळे.उपसरपंच विठ्ठलराव बेडजवळगे.ग्रामपंचायत अधिकारी चलमले साहेब. सह ग्रामपंचायत सदस्य
दावतपूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते





















Total views : 12303