प्रभाग क्रमांक १४ -ब.मध्ये शेख शौकत नुरुद्दीन यांच्या सामाजिक कार्याचा ठसा . ( सय्यद कलीम मुसा )
प्रभाग क्रमांक १४-ब मधून शेख शौकत नुरुद्दीन हे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आहेत. सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने नागरिकांमध्ये त्यांची विश्वासार्ह व मदतीसाठी तत्पर अशी ओळख निर्माण झाली आहे.
त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी सांगितले की, “गोरगरिबांच्या अडचणीला तत्पर धावून जाणारा माणूस म्हणजे शौकत भाई”. कोणतेही सामाजिक काम असो—सहकार्याची तयारी, तडफ आणि कर्तव्यभावना हे त्यांचे वेगळेपण असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे.
स्थानिकांच्या मते, वैयक्तिक अडचण असो वा सार्वजनिक गरज—शौकत नुरुद्दीन हे स्वतः पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी समोर येतात. त्यामुळे “सुखद भाई म्हणजे काम करणारा आणि तडफदार” अशी त्यांची ओळख परिसरात दृढ झाली आहे.
प्रभाग क्रमांक १४-बमध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची चर्चा रंगत असून, नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.





















Total views : 4449