तुळजापूरच्या विकासगाथेत विनोद (पिट्टू भैया) गंगणे यांचे कार्य पुन्हा चर्चेत
तुळजापूर – प्रतिनिधी
तुळजापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या दोन दशकांत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विनोद (पिट्टू भैया) गंगणे यांचे नेतृत्व सातत्याने लक्षवेधी राहिले आहे. नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांची मालिका आजही स्थानिकांच्या स्मरणात ताजी असून, शहराच्या विकास प्रवासात त्यांच्या योगदानाचा ठसा उमटलेला दिसतो.
२००४ मधील पाण्याच्या टंचाईच्या परिस्थितीत मोफत पाणी वाटप, २००५ मध्ये चिकनगुनिया साथीच्या काळात उभारलेला मोफत दवाखाना, तसेच २००६ मध्ये जिजामाता नगर निवडणुकीत बहुमताचा विजय—ही त्यांच्या कार्याची प्रारंभीची उल्लेखनीय उदाहरणे.
लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांवर येणारी अडचण ओळखून २००६ मध्ये मोफत जनरेटर वाटपाची योजना राबविण्यात आली. २००७ पासून महिलांसाठी नागपंचमी उत्सव, लकी ड्रॉ आणि दिवाळीच्या निमित्ताने किराणा किट व भाऊबीज भेट यांचा उपक्रम अखंड सुरू आहे.
२००८ मध्ये तरुणांसाठी ऑटो रिक्षा, २००९ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी सायकल रिक्षा, २०१० मध्ये लहान मुलांसाठी उद्यान निर्मिती—ही समाजाभिमुख कामे शहराच्या दैनंदिन गरजांवर आधारित होती.
२०११ मध्ये नागरिकांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत सर्व नगरसेवकांना पुढे पाठवले आणि अर्चना ताई गंगणे नगराध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. २०१२ मध्ये तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, बाग-बगिच्यांचे काम अधिक वेगाने राबविण्यात आले.
२०१५ मधील दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी RO जार आणि टँकर वाटप, तर कोरोनाच्या संकटात सलग ५० दिवस अन्नदान, किराणा, भाजीपाला, अन्नधान्य, गॅस सिलेंडर, मास्क, गोळ्या आणि सॅनिटायझर वितरण—या उपक्रमांचा अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला. रमजान व ईदसाठीही आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, आरोग्य क्षेत्रातील उपक्रम आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीतून विविध स्तरांवर काम केल्यामुळे विनोद (पिट्टू भैया) गंगणे यांचे नाव स्थानिक पातळीवर पुन्हा चर्चेत आहे.
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे शहरातील नागरिक आणि स्थानिक घटकांचे लक्ष वेधले गेले आहे.





















Total views : 4449