श्री तपोरत्नं क्रीडा महोत्सव उत्साहात
श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने श्री गुरुमाउली लिं. श्री. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या ८ व्या पुण्याराधनानिमित्त श्री तपोरत्नं क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री वीरतपस्वी शिक्षण संकुल एमआयडीसी सोलापूर येथील शिक्षण संकुलात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीपीठाचे जगद्गुरू डॉ.
मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव एस. जी. स्वामी, संस्थेचे संचालक डॉ. राजेंद्र घुली, शशिकांत रामपुरे, शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे एस.व्ही.सी.एस., संस्थेच्या विविध शाखेतील प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य संगप्पा म्हमाणे यांनी केले.
श्री तपोरत्नं क्रीडा महोत्सवात संस्थेतील १२ शाळांचे कब्बड्डी व व्हॉलिबॉलचे संघ सहभागी झाले होते. यावेळी काशीपीठाच्या जगद्गुरुंनी संस्थेतील गुणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सलग तीन वर्षे विजेत्या संघास प्रत्येकी १ लाख रुपये व सलग दोन वर्ष विजेत्या संघास प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सांस्कृतिक विभागप्रमुख केदार पटणे केले.





















Total views : 4449