३१ जवळा (नि.) जिल्हा परिषद गटात ‘विकासाची छत्री’ ठरणाऱ्या नेतृत्वाची चर्चा
धनंजय सावंत यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा..!!
३१ जवळा (नि.) जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत उमेदवार म्हणून धनंजय सावंत यांचे नाव सध्या चर्चेत असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर सामाजिक कार्य, विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने घेतलेली भूमिका आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांच्याकडे विकासाची छत्री म्हणून पाहिले जात असल्याची भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत.
संकटाच्या वेळी आधार देणारी, अडचणीच्या प्रसंगी सोबत उभी राहणारी आणि विकासाच्या वाटेवर मार्गदर्शन करणारी ही हक्काची छत्री केवळ घोषणा नसून कामातून दिसते, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच धनंजय सावंत यांची ओळख आपल्या माणसाची छत्री म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर लक्ष देत सर्वसमावेशक विकासाची भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे निरीक्षक सांगतात. 31 जवळा (नि.) गटात विकासकेंद्रित आणि सर्वसामान्यांना कवेत घेणाऱ्या विकासाची छत्री कोण ठरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
(





















Total views : 5089