• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 19, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशिव जि.प. अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची लवकरच घोषणा?

Sayyad Musa by Sayyad Musa
February 21, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

राजकीय भूकंप!
धाराशिव जि.प. अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची लवकरच घोषणा?
“पाटील घराणे दिलेला शब्द पाळते, जे बोलते ते करते,”

धाराशिव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीभोवती धाराशिवच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून सत्तेच्या समीकरणांनी वेग घेतला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत अर्चनाताई पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः “राजकीय भूकंप” झाल्याची चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याची चर्चा असून, आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव पूर्ण केल्याचा दावा पक्षांतर्गत स्तरावर केला जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, संभाव्य स्वागताची तयारीही सुरू झाल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. जिल्हा तसेच राज्य पातळीवर वाढत चाललेले त्यांचे राजकीय वजन लक्षात घेता, अध्यक्षपदाच्या समीकरणामागे त्यांची रणनीती महत्त्वाची ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, युवा चेहरा म्हणून पुढे येत असलेले मल्हार राणाजगजितसिंह पाटील हेही सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचे केंद्र ठरत आहेत. भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकू येत आहे.
“पाटील घराणे दिलेला शब्द पाळते, जे बोलते ते करते,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. राजकीय डावपेच, कुजबुज आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विरोधकांकडूनही पडद्यामागे हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत असले तरी, बहुमत स्पष्ट झाल्याच्या चर्चेमुळे सत्तापरिवर्तनाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत होऊ घातलेला हा सत्ताबदल खरोखरच नेतृत्व बदलाचे पर्व ठरणार का? आणि या निर्णयाचा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर नेमका काय परिणाम होणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Previous Post

तेर येथे एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस वितरण

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप!आमिषाला थारा नाही; महेंद्र धुरगुडे ठाम — भाजपसोबतच राहणार

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप!आमिषाला थारा नाही; महेंद्र धुरगुडे ठाम — भाजपसोबतच राहणार

धाराशिव कला केंद्रातील नर्तिकांची हाक : “दोषींवर कारवाई करा; पण आमच्यावर उपासमारी ओढवू नका”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ : नामांकन जाहीरमौजे जेवळी (ता. लोहारा) येथे सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर

April 18, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

April 16, 2026

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवडनायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी

April 16, 2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

April 16, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005523
Total views : 9318

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In