धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची निवड झाल्याने जिल्हाभरातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच त्यांच्या अध्यक्षपदाच्या शक्यतेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून वेळोवेळी व्यक्त झालेल्या अंदाजांना आता प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळाल्याची चर्चा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगत आहे.
अर्चनाताई पाटील यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्हा परिषद या संस्थेच्या कामकाजाला नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि विकासकामांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अर्चनाताई पाटील यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासकामांना नवे बळ मिळेल, तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्चनाताई पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी सत्कार आणि अभिनंदन कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
संपादक सय्यद कलीम मुसा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नंबर. 9096016877.




















Total views : 6917