ईट येथे ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने आयोजन
ईट | प्रतिनिधी
ईट येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त जामा मशीद परिसरात ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सावंत यांनी ईट येथील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकोपा, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
रमजान हा संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा महिना असून, समाजात शांतता व सौहार्द टिकवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवित्र रमजान निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
— प्रविण देशमुख
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, भूम






















Total views : 6917