दिव्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत पार पडली शांतता बैठक…
अमित जाधव
ठाणे दिवा: दिव्यात १४ एप्रिल रोजी साजरी होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिवा शहरात उत्साहात आणि शांततेत पार पडावी, यासाठी मुंब्रा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दिवा शहरातील आंबेडकर
चळवळीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.उत्सवादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये, या उद्देशाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे API अमोल कोळेकर व अनिल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान विविध उत्सव आंबेडकर चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या, तसेच उत्सवाच्या नियोजनात येणाऱ्या संभाव्य अडचणी व समस्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या. सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांनी या समस्या जाणून घेत, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना सर्व मंडळांना दिल्या. शांतता आणि शिस्त पाळून महामानवाची जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनावणे यांच्या सह, गुप्त वार्ता पोलीस रवी सातपुते तसेच आदी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य करण्यात आले.




















Total views : 9132