भारतीय संविधानाचे आधुनिक निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर!:
पुसद येथे लेखक: जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन
धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यक्रमाचे दुसरे पुष्प
कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नव्हे तर या देशातील सर्वांचे उद्धारक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अखिल मानव जातीच्या कल्याणाचे कार्य आहे. बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानावर आधुनिक भारत उभा राहिला आहे हे आजच्या पिढीने ते समजून घेतलं पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ .यांनी पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वात दुसरे पुष्प गुंपताना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.प्रशांत वासनिक होते प्रमुख अतिथी म्हणून राजूभाऊ सोळंके संजय राठोड, सुनील भालेराव, दिलीप पारध, डॉ रामचंद्र राठोड, प्रभाकर टेटर, मिलिंद जाधव, अरुण मनवर, गजानन जाधव, दीपक काळे, ऋषिकेश पंडितकर, सतीश नांदगावकर, श्रीराम पवार, ज्ञानेश्वर तडसे,विश्वास भवरे, देवेंद्र खडसे, दिगंबर वसेकर, आरिफ अहमद, धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष प्रा.सुनील खाडे यांच्यासह विचारपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समता महिला मंडळ व लुंबिनी महिला मंडळ यांनी सामाजिक बुद्ध वंदना सादर केली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली रेवसे यांनी केले आभार प्रदर्शन उषा राजेश ढोले यांनी मानले.कार्यक्रमाला पुसद तालुक्यातील बहुसंख्येने बहुजन समाज बंद व बौद्ध धम्म बांधव महिला, युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज दिनांक १०एप्रिल रोजी यशवंत स्टेडियम पुसद येथे शाहिरी जलसा निर्मिक प्रस्तुत जागर समतेचा काव्य नाट्य संगीतमय आंबेडकर शाहीर जलसा मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला बहुसंख्य बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रज्ञा प्रभू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



















Total views : 9127