सिंदफळमध्ये काटगाव जिल्हा परिषद गटाची बैठक उत्साहात; संघटनात्मक तयारीचा आढावा
( सय्यद कलीम मुसा )
सिंदफळ (ता. तुळजापूर): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंदफळ येथे काटगाव परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संघटनात्मक तयारी, समन्वय आणि पुढील प्रक्रियेचे नियोजन यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीवर भर देत परस्पर संवादातून स्थानिक स्तरावरील उपक्रमांचा आढावा घेतला. काटगाव परिषद गटातील विविध गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.
अर्चनाताई पाटील यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन गटातील चालू घडामोडी तसेच कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, समन्वय आणि स्थानिक प्रश्नांवरील चर्चा करण्यात आली.

























Total views : 4449