सामाजिक संवेदनशीलतेची जाण : मल्हार पाटील यांचा विवाह साधेपणात पार पडणार – अर्चना राणाजगजीतसिंह पाटील
धाराशिव –दै त्रिशक्ती
धाराशिव जिल्ह्यात यावर्षीच्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकरी कुटुंबांवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. या स्थितीची गंभीरता ओळखत पाटील कुटुंबीयांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी प्राधान्याने समोर ठेवत मोठा निर्णय घेतला आहे.
अर्चना ताई आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या परिवाराने मल्हार आणि साक्षी यांच्या विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळत, हा महत्वपूर्ण क्षण फक्त निकटवर्तीयांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने करण्याचे ठरविले आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर परिसरात मोजक्या उपस्थितीत हा शुभविवाह पार पडणार असून, जिल्ह्याची परिस्थिती सुधरल्यानंतर स्वतंत्र शुभाशीर्वाद सोहळा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती अर्चना ताई पाटील यांनी दिली.
वर्तमान परिस्थितीत घेतलेला हा निर्णय सामाजिक जाणिवेचे आणि कुटुंबाच्या संवेदनशील मूल्यांचे उत्तम उदाहरण ठरत आहे.























Total views : 4449