सौ. संयोगीता गाढवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सय्यद कलीम मुसा
भूम │ नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्षा सौ. संयोगीता गाढवे यांनी आज नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान माजी मंत्री आणि आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय नाना गाढवे तसेच शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके यांच्या उपस्थितीने शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम पार पडला.
निवडणूक आचारसंहितेचे सर्व नियम पाळत ही प्रक्रिया सुरळीतरीत्या पूर्ण झाली. स्थानिक नागरी समस्यांवर परिणामकारक कामकाज व विकासात्मक दृष्टीकोन यावर भर देत सौ. गाढवे यांनी आगामी निवडणुकीत नागरिकांचे समर्थन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.




















Total views : 4448