तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी अमर मगरांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीची शक्तीप्रदर्शन
सय्यद कलीम भुसा
तुळजापूर, दि. १७ नोव्हेंबर
तुळजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीने आपला अधिकृत उमेदवार म्हणून अमर अशोकराव मगर यांचा नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आला. अर्ज दाखल कार्यक्रमाला आघाडीतील सर्व घटक पक्षांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावल्याने शहरातील निवडणूक वातावरणाला चांगलाच वेग प्राप्त झाला आहे.
अर्ज सादर करताना महाविकास आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज कदम-पाटील, बाबासाहेब क्षिरसागर, समाजवादी पार्टीचे युवा नेते कृष्णा रोचकरी, शिवसेना नेते श्याम पवार, श्रीकांत धुमाळ, नरेश पेंदे, शहराध्यक्ष भारत कदम यांच्यासह विविध मान्यवरांनी उमेदवारास पाठिंबा दर्शवला.
तसेच दिग्विजय पाटील, नितीन पाटील, सुधीर कदम, युवा नेते ऋषिकेश मगर, अमोल कुतवळ, श्रीकांत रसाळ, अमर चोपदार, दिलीप मगर, आनंद जगताप, रणजीत इंगळे, रत्नदीप मगर, रत्नदीप पाटील, तोफिक शेख, अर्जुन साळुंखे, बालाजी तट, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
अमर मगर यांच्या उमेदवारी अर्जामुळे तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार सुरुवात केली असून, या कार्यक्रमानंतर शहरातील निवडणुकीची तापमान आणखी वाढले आहे.




















Total views : 4448