चैतन्यबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ देशमुख सह कुटूंब प्रचारात सक्रिय .
➡️ वार्ड क्रमांक दहा मधील प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यातही घेतली आघाडी .
मोहोळ:- मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मोहोळ शहरातील वार्ड क्रमांक दहा मध्ये प्रचाराच्या दुसऱ्या टप्यात चैतन्यबापू यांनी मोठी आघाडी घेतली असून दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात वार्डात देशमुख सह कुटूंब प्रचारात उतरल्याने विरोधकाची पायखालची वाळू सरकायला लागली आले . चैतन्यबापू देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे आता या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाची मोठी ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्यांचे वडील तथा ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख यांनी आपले चिरंजीव आणि सी पी उद्योग समूहाचे युवा उद्योजक चैतन्यबापू देशमुख यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवत शहराच्या राजकारणामध्ये मोठ्या चर्चेचा विषय सध्या मोहोळ शहरात झाला आहे .आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, ओबीसी विभागाचे शिवसेना शिंदे पक्षाचे राज्याचे नेते रमेश बारसकर, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनीही आपली पुर्ण ताकद चैतन्यबापु देशमुख यांच्या विजयासाठी त्यांच्या पाठीशी लावली आहे . पद्माकर अप्पा देशमुख यांनी आपल्या चिरंजीवाच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकल्यामुळे अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान,चैतन्य बापू यांचे बंधूराज या निवडणुकीत प्रसाद देशमुख हे देखील संपूर्ण प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. मागील निवडणुकीत आप्पांचे पुतणे शिवसेनेचे युवा नेते विक्रम देशमुख केवळ नऊ मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी पद्माकर आप्पा देशमुख यांच्या परिवारातील जेष्ठ सदस्यांचे निधन झाल्यामुळे हा परिवार पूर्ण ताकतीने या निवडणुकीच्या प्रचारात उतरू शकला नव्हता. याचा मोठा फायदा भाजपाला होऊन भाजपाने या
ठिकाणी विजयाचा जल्लोष केला होता. आता परत एकदा देशमुख परिवारात निवडणुकीच्या रिंगणात उतरून धनुष्यबाणाच्या चिन्हावर प्रभावीपणे मतदान मागताना वार्ड क्रमांक दहा मध्ये दिसत आहे.
वार्ड क्रमांक दहा मधून पुन्हा शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून पद्माकर देशमुख आणि भाजपा यांच्यातच खरा सामना होणार आहे. विशेष म्हणजे पद्माकर देशमुख यांनी यावेळी सोबत गाढवे – माने वस्ती मधील यापूर्वी भाजपामधुन निवडूण आलेल्या माजी नगरसेविका सुवर्णा गाढवे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या भाजपमध्ये असलेल्या आणि आता शिवसेना शिंदे पक्षात गेलेल्या गाढवे यांनी सध्या भाजपने उमेदवारी दिलेल्या गाढवे वस्तीवरील उमेदवारा विरोधात प्रचारात चुरस निर्माण केली आहे. त्यांना पद्माकर देशमुख यांच्या प्राचार्य यंत्रणेची साथ मिळाल्यामुळे आता या प्रभागातील चुरस वाढली आहे.






















Total views : 4449