प्रभाग ६ ब मध्ये विकासाच्या मुद्द्यांवर सौ. ऋतुजा भोसले यांची सक्रिय धडपड ;
नागरिकांशी साधलेल्या संवादामुळे वाढतोय प्रतिसाद .!!
धाराशिव : (दि. ३० नोव्हेंबर)
प्रभाग क्रमांक ६ ब मध्ये गेल्या काही दिवसांपासून विकासकामांच्या मागण्यांवर नागरिकांत चर्चा सुरू असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. ऋतुजा भोसले यांची सक्रियता लक्षवेधी ठरत आहे. विविध प्रभागीय प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळते.
सौ. ऋतुजा भोसले या दिवंगत मोहन (काका) मुंडे यांची सुन असून, युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रितम (बंटी भैय्या) मुंडे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या कुटुंबाने प्रभागातील विविध सामाजिक कामांत सातत्याने सहभाग ठेवला असल्याने नागरिकांमध्ये घनिष्ठ नाते कायम असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान,गेल्या ६–७ वर्षांपासून प्रभागातील अनेक प्रलंबित विषय हाताळून मार्गी लावण्यात त्या पुढाकार घेतल्या, अशी माहीती स्थानिक नागरिकांकडून मिळते. विशेषतः पाणीपुरवठा, रस्ते, नाले व परिसर स्वच्छता अशा मूलभूत सुविधांबाबत नागरिकांशी संवाद साधून अपेक्षा जाणून घेत त्या न.प. प्रशासनाकडे वेळोवेळी मांडत आल्याचे बोलले जाते.
अठरा पगड बहुजन समाजघटकांशी घरगुती नात्याप्रमाणे संपर्क ठेवणाऱ्या भोसले यांचे प्रभागातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम निधी आणण्याबाबत त्यांनी मांडलेली भूमिका अनेकांना आशादायी वाटत असल्याचेही नागरिक सांगतात.
यावेळी बोलताना काही स्थानिकांनी सांगितले की,“प्रभागातील कामांसाठी प्रशासन दरवाज्यावर ठोठावण्याची गरज भासली, तर त्या स्वतः विविध कार्यालयांत पाठपुरावा करताना दिसतात. काही ठिकाणी रस्ते–नाले विषयक प्रश्न गंभीर झाले तेव्हा स्थानिकांसोबत त्यांनी जोरकस पद्धतीने भूमिका मांडली.”
प्रभागात सध्या डोअर टू डोअर संवाद मोहीम सुरू असून, नागरिकांच्या सूचनांनुसार आगामी विकास आराखडा तयार करण्यावर भोसले भर देत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजनबद्ध काम करणार असल्याचा विश्वास उमेदवाराकडून व्यक्त करण्यात आला आहे.























Total views : 4449