संघटन बळकटीसाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियानाला नागरिकांमधून उस्फूर्त प्रतिसाद..!!
‘त्रिशक्ती’चे संपादक सय्यद कलीम मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे तळागाळातील नागरिकांमध्ये विश्वास..
धाराशिव : – धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रभर संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान जोमाने सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ताकद पोहोचवण्यासाठी गावागावात शाखा उभारण्याचा निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला आहे.
अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या वतीने संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देण्यात येत असून, जिल्हा, तालुका व शहर पातळीवर नवे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जबाबदार नेतृत्व घडवण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनेत सन्मान, भूमिका आणि कामाची संधी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक ‘त्रिशक्ती’चे संपादक सय्यद कलीम मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे तळागाळातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत असून, संघटनेत सहभागी होण्यासाठी तरुण, सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक पुढे येत आहेत.
सामाजिक न्याय, हक्कांचे संरक्षण आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी संघटनेसोबत जोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “चला, संघटित होऊया – आपल्या हक्कांसाठी एकत्र उभे राहूया” हा संदेश घेऊन हे अभियान पुढे सरकत आहे.





















Total views : 4449