महावितरणचे लांबोटीचे कनिष्ठ अभियंता ओंकार साठे यांचे अखेर निलंबन .
➡️ मोहोळचे आ. राजू खरे यांचा दणका!
➡️ शेतकऱ्यासाठी उठवला होता नागपूर हिवाळी अधिवेशनात आवाज .
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ: आक्टोबर महिन्यात झालेल्या अति पाऊसामुळे सीना नदीच्या मोठा पुर आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झालेला होतो आणि ट्रासिफॉर्म खराब झाले होते . त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्म बसविण्याकरीता तांबोटीच्या विद्युत केंद्रातील अभियंता ओंकार साठे यांच्या कडे मागणी केली होती वारंवार ट्रान्सफॉर्म बसविण्याची सर्व शेतकऱ्यांनी विनंती केली होती परंतू अभियंता ओंकार साठे हा त्या शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत होता . त्याची तक्रार मोहोळचे आमदार राजू खरे यांना भेटून त्या अभियंत्याची तक्रार केली . ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार राजू खरे यांनी विधानसभेत त्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर महावितरणने तातडीने कारवाई करत लांबोटी विद्युत केंद्रातील सहाय्यक अभियंता निलंबित करण्यात आला.
मोहोळ तालुक्यातील सीना नदीला ऑक्टोबर महिन्यापूर्वी आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत नाही, तो सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवावा लागतो. तो बसविण्या साठी लांबोटी येथील विद्युत केंद्रातील सहाय्यक अभियंता ओंकार साठे हा शेतकऱ्यांना पैसे मागत होता. या बाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार खरे यांच्याकडे केल्या होत्या. आमदार खरे यांनी या बाबतचा तारांकित प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता. त्याची दखल घेत सहाय्यक अभियंता साठे याला निलंबित केल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातून वाहत जाणाऱ्या सीना नदीला सिना- कोळगाव धरणातून दोन ते तीन लाख क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील विद्युत महावितरणचे खांब पडले होते, तर अनेक ट्रान्सफॉर्मर पाण्या मुळे खराब झाले होते. गेल्या दोन ते तीन महिन्या पासून पूरग्रस्त गावातील विद्युत पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती बागायत करता येईना तर जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे.
नदीकाठची गावे ही लांबोटी विद्युत केंद्राच्या अधिपत्या खाली येतात. लांबोटी येथील सहाय्यक अभियंता ओंकार विष्णू साठे हा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागत होता. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार खरे यांच्याकडे केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत आमदार खरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात या बाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेत सहायक अभियंता ओंकार साठे याला सोलापूर येथील महावितरण चे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांनी सेवेतून निलंबित केले आहे.
चौकट : – तलाठी व ग्रामसेवकावर ही लवकरच कारवाई होणार .
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अति पाऊसामुळे सीना नदीला महापूर आला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . शेतीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवकांनी बाधीत शेतकऱ्या कडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन पंचनामे करून दिल्याने शेतकर्यांनी माझ्याकडे तलाठी आणि ग्रामसेवका बद्दल मोठ्या तक्रारी आल्या होत्या . त्या तक्रारी मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न केले होते याची दखल घेत लांबोटीच्या अभियंत्यांला निलंबीत करण्यात आले असून अजून या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे कोणाचीही गैर केली जाणार नाही .
आमदार राजू खरे .






















Total views : 4449