धाराशिव जिल्ह्यात खुले आम गुटख्याची विक्री ; मोकाका अंतर्गत गुटखा माफियावर कारवाई कधी करणार ?
अन्न व भेसळ आणि पोलिस विभागाच्या कामगिरीवरती नागरिकामधून प्रश्नचिन्ह . .!!!
➡️ कुठल्याही चौकात, गल्लीत, टपरीवर सहज उपलब्ध – प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांचा प्रश्न ?
धाराशिव | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही, धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुटखा खुलेआम विकला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील चौक, गल्ली, नुक्कड, टपरी तसेच छोट्या-मोठ्या दुकानांवर आरएमडी, विमल, गोवा, बादशाह, बाबा, राजनिवास आदी विविध नावांचे गुटखे कोणत्याही बंदना शिवाय सहज उपलब्ध होत आहेत.
विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बेकायदेशीर विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे की ? मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “इतक्या सहजपणे गुटखा मिळत असेल तर विक्रेत्यांना कुणाचा आशीर्वाद आहे का?”, “यामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का?”, “ठोक व किरकोळ विक्रेत्यांवर ठोस कारवाई का होत नाही?” असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
गुटख्याच्या सेवनामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत असून, कॅन्सरसह विविध गंभीर आजारांना बळी पडत असल्याचे वैद्यकीय अहवालातून सातत्याने समोर येत आहे. मात्र, या सामाजिक व आरोग्यदृष्ट्या गंभीर प्रश्नावर कारवाईचा दरारा दिसून येत नाही, हेच धक्कादायक वास्तव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्यात यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये गुटखा तस्करी व विक्रीप्रकरणी संघटित गुन्हेगारी स्वरूप आढळून आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोकाका), तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, भा.दं.वि. अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र धाराशिव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असताना, अश्या प्रकारची कुठलीच मोठी कारवाई होताना दिसत नसल्याने अन्न व भेसळ विभागाच्या कारभारावरती प्रश्न निर्माण होत आहे तरी कठोर कारवाई का होत नाही, हा प्रश्न कायम आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, गुटखा विक्रीमागील संपूर्ण साखळीचा तपास करावा,
ठोक पुरवठादार व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी,
गरज भासल्यास मोकाकासारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत,
आणि बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून तरुण पिढीचे आरोग्य वाचवावे.
कोट : – “गुटखा विक्रीवर कारवाई कधी होणार?”
नागरिक आता थेट सवाल प्रशासनाला करत असून, याकडे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





















Total views : 4449