तेर येथे पारंपारिक पद्धतीने ‘दर्श वेळ अमावस्या’ सण उत्साहात साजरी .
तेर : तेर येथील शेतात पारंपारिक पद्धतीने दर्श वेळ अमावस्या हा सण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व भावी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या वेळी शेतकरी संस्कृती जपणाऱ्या या उत्सवानिमित्त काळ्या आईची तसेच मातीपासून तयार केलेल्या पांडवांची विधिवत पूजा करण्यात आली. शेती, निसर्ग आणि परंपरेशी नाते दृढ करणारा हा सण बळीराजासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.
या प्रसंगी बळीराजाला सुख-समाधान, समृद्धी व भरघोस पीक लाभो, अशी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात आली.


























Total views : 4449